टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Whatsapp ग्रुप जॉईन करा

कृषी ड्रोन सबसिडी योजना येथे अर्ज करा | Drone Anudan Yojana

Drone Anudan Yojana: ड्रोन अनुदान योजनेतून आता शेतकऱ्यांना शेतात औषध फवारणीसाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना फवारणीसाठी ड्रोन मिळणार असून याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना कमी वेळेत जास्त काम करता येणार आहे. देशातील शेतकरी पीक संरक्षणासाठी शेतात फवारणी करतात, त्यासाठी पाठीवर पंप वापरतात, फवारणी करताना शेतकऱ्यांकडे कीटकनाशकांपासून संरक्षणाची कोणतीही सोय नसते, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात, काहींना विषबाधा होते, आणि दुर्दैवाने काही शेतकरी मरण पावतात.

या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने शेतात फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक साधनांचा वापर करता यावा आणि कृषी क्षेत्रात ड्रोन फवारणीचा वापर वाढावा या उद्देशाने कृषी ड्रोन अनुदान योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणून आम्ही या योजनेचे संपूर्ण तपशील आणि फायदे, अर्ज कसा करायचा, अर्जाचा फॉर्म इ. खाली पाहतो.

कृषी ड्रोन अनुदान योजना माहिती

देशातील शेतकरी पीक संरक्षणासाठी शेतात फवारणी करतात त्यासाठी ते पाठीवरच्या पंपाचा वापर करतात तसेच फवारणी करताना शेतकऱ्यांजवळ कीटकनाशकांपासून संरक्षणासाठी काहीच सुविधा उपलब्ध नसतात, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना त्वचेचे आजार होतात काहींना विषबाधा होते व त्यामधील काही शेतकऱ्यांना दुर्दैवाने मृत्यू देखील होतो.

या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने शेत फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा विचार केला आहे त्यासाठी ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आधुनिक साधनांचा उपयोग करता यावा तसेच कृषी क्षेत्रात ड्रोन द्वारे फवारणीच्या वापरात वाढ व्हावी या उद्देशाने कृषी ड्रोन अनुदान योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Drone Anudan Yojana
कृषी ड्रोन अनुदान योजना माहिती

महिलांच्या हाती बचत अन् ड्रोन उडेल हवेत

महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला असून निधी देखील मंजूर केला आहे. भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता १५,००० निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून ही योजना राबविण्यात येणार आहे.

 • कालावधी २०२४-२५ ते २०२५-२६
 • निधी मंजूर (कोटीमध्ये) १,२६१ प्रति बचत गट
 • ड्रोन खरेदीसाठी मिळणारी रक्कम 8,00000
 • एकूण लाभ मिळणाऱ्या महिला बचत गटांची संख्या १५०००
 • बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपजीविकेची सोय होऊन आर्थिक आधार मिळेल आणि ते वार्षिक किमान एक लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील.
हे पण वाचा »  तुम्हांलाही शेती करायचीय? राज्य सरकार देतंय जमिनी इथे करा अर्ज!

योजनेची वैशिष्ट्ये

 • आर्थिकदृष्ट्या ड्रोनचा वापर व्यवहार्य असलेले योग्यक्लस्टर्स शोधून काढून विविध राज्यांमधील अशा क्लस्टर्समधील प्रगतशील महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाईल.
 • महिला बचत गटांच्या एका सदस्याची निवड राज्य ग्रामीणउपजीविका अभियान आणि एलएफसीद्वारे १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल. ज्यामध्ये ५ दिवसांचे अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फवारणीच्या १० दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे.
 • ड्रोनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, ड्रोन पुरवठादार कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतनीस (मध्यस्थ) म्हणून एलएफसी काम करतील.
 • स्वयंसहायता गट शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी आणि कीटकनाशकांच्या वापरासाठी ड्रोन सेवा भाड्याने देतील.

कृषी ड्रोन अनुदान योजना पात्रता | Drone Anudan Yojana

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे
 • या योजनेसाठी कृषी विज्ञान केंद्रे, कृषी उत्पादन संस्था, कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी संशोधन संस्था परिषद, कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणे तपासणी संस्था इत्यादी पात्र असतील.

ड्रोन अनुदान योजनेचे फायदे

 • कृषी ड्रोन अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे.
 • कीटनाशक फवारणी करताना शेतकराण्या विषबाधेचा धोका नाही.
 • या योजनेअंतर्गत कृषी पदवीधरांना ५ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
 • इयत्ता १०वी उत्तीर्ण व रिमोट तंत्राचे प्रशिक्षण असलेल्या ग्रामीण भागातील कोणत्याही युवकाला ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
 • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या माध्यमातून शेती विषयक विविध कामे केली जाऊ शकतील.
 • राज्यातील शेतकऱ्यांना शेतात फवारणीसाठी कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची देखील आवश्यकता भासणार नाही.
 • कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
 • ड्रोन मुळे फवारणीची कामे जलद गतीने करता येतील.
हे पण वाचा »  महाराष्ट्रातील वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार: विमुक्त जाती आणि भटके जमातींमधील विद्यार्थ्यांना सन्मान आणि आर्थिक पाठबळ

Drone Anudan Yojana अटी

 1. ड्रोन ची खरेदी किमतीची पुर्ण रक्कम भरुन खुल्या बाजारातुन ड्रोन व इतर उपकरणे ची खरेदी करण्यास संस्था तयार आहे.
 2. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापनेकरीता बॉन्ड पेपरवर हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे, याची मला जाणीव आहे.
 3. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या माफक भाडेतत्वावर ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र सेवा-सुविधा पुरविण्यास आमची तयारी आहे.
 4. अनुदानाची रक्कम माझे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल याची मला कल्पना आहे, त्याकरीता मी माझे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे.
 5. मी ड्रोन व इतर उपकरणे खुल्या बाजारातुन माझ्या पसंतीने खरेदी करणार असल्याने ड्रोन व इतर उपकरणे गुणवत्तेची सर्वस्वी जबाबदारी माझी राहील याची मला जाणीव आहे.
 6. तसेच यापुर्वी मी उपरोक्त प्रस्तावासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी कोणत्याही शासकीय/निमशासकीय यंत्रणेकडून अनुदान/आर्थिक मदत घेतलेली नाही.
 7. ड्रोन व इतर उपकरणे खरेदीकरीता पुर्वसंमती मिळाल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत औजारे/यंत्रांची खुल्या बाजारातुन खरेदी करणे आवश्यक आहे, अन्यथा प्रदान केलेली पुर्वसंमती रद्द होईल, याची मला जाणीव आहे.
 8. मला ड्रोन व इतर उपकरणे खरेदीकरीता पुर्वसंमती मिळाल्यानंतर ड्रोन व इतर उपकरणे खुल्या बाजारातुन खरेदी करताना संस्थेच्या बॅन्क खात्यातुन इलेक्ट्रॉनिक पध्दतीने(आर.टी.जी.एस. ईत्यादी)/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधनकारक आहे, याची मला जाणीव आहे
 9. ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र -सेवा-सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक अनुभव, प्रशिक्षीत, अनुभवी व पुरेसे मनुष्यबळ असणे, यंत्रसामुग्री व उपकरणे सुरक्षीत व सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक जागा व शेडची व्यवस्था असणे बंधनकारक राहील. सर्व यंत्रसामुग्री व उपकरणे संबंधीतांनी माफक भाडे तत्वावर उपलब्ध करुन त्यांच्या सेवा शेतक-यांना वेळोवेळी पुरविणे बंधनकारक राहील.
 10. संस्थेने ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र सेवा-सुविधा शेतक-यांना पुरविल्याबाबत आवश्यक अभिलेख ठेवणे व त्याचा नियमीत अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. तसेच, याबाबत तपासणीच्या वेळी सर्व यंत्रसामुग्री/उपकरणे व अभिलेख सादर करणे बंधनकारक राहील.
 11. सदर कार्यक्रमांतर्गत पुरविण्यात येणा-या यंत्रसामग्री व उपकरणे यांची नियमीत देखभाल व दुरुस्ती करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभधारक संस्थेची राहील, संबंधीत सेवा-सुविधा केंद्रे व्यवस्थित चालविणे व वेळोवेळी त्यात सुधारणा करण्याची तयारी असणे आवश्यक राहील,
 12. Ministry of Civil Aviation ,CIB&RC यांचेकडील मार्गदर्शक सूचना प्रमाणे कार्यवाही करणे बंधनकारक राहील
 13. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या SOP प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक राहील.
हे पण वाचा »  Shiv Bhojan Thali Scheme: महाराष्ट्रातील शिवभोजन थाळी योजना 2024

Drone Anudan Yojana Documents

ड्रोन प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:-

 • आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळखपत्राची स्वयंसाक्षांकित प्रत
 • राशन कार्ड
 • रहिवाशी प्रमाणपत्र
 • ईमेल आयडी
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो
 • बँक पासबुकाच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत / रद्द केलेला धनादेश
 • खरेदी करावयाच्या ड्रोन चे कोटेशन/विक्रेत्याची संपूर्ण माहिती
 • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
 • अधिकृत रिमोट पायलट ट्रैनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील
 • कृषी पदवी
 • संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
 • संस्थेशी संबंधीत व्यक्तीच्या बॅन्क खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधीकृत केले असल्यास प्राधीकृत केल्याचे पत्र.
 • अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडील प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट परवाना धारक चालकाचे नाव व तपशील (कागदपत्रे जोडण्यात यावी)
 • अर्जदार संस्था असल्यास संस्थेचा पुरावा
 • स्वयं घोषणापत्र
 • पूर्व संमतीपत्र

कृषी ड्रोन अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया

कृषी ड्रोन समर्थनार्थ अर्ज पद्धती:-

 • सर्व प्रथम अर्जदाराने त्याच्या जिल्हा कार्यालयातील कृषी विभागाकडे जावे.
 • कृषी ड्रोन अनुदान योजनेसाठी कार्यालयातून अर्ज घ्यावा लागेल.
 • उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि तो अर्ज सादर करावा लागेल.
 • हे या योजनेअंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करेल.

ड्रोन अनुदान योजना पूर्ण तपशील

Leave a Comment