Advertisement

Gram Panchayat Gharacha Utara: ग्रामपंचायत घराचा उतारा ऑनलाईन मिळणार आहे, काही ग्रामपंचायत मध्ये हि सुविधा सुरु झाली आहे

Gram Panchayat Gharacha Utara

आधी आपल्याला उतारा(property utara) काढायचा असेल तर ग्रामपंचायत मध्ये जावे लागत होते. आता आपल्याला ग्रामपंचायत घराचा उतारा (Assessment Utara Online) मोबाईल वरती काढता येणार आहे. काही मिनिटातच आपण हा उतारा घरबसल्या काढू शकता. त्याच बरोबर ग्रामपंचायत जन्म मृत्यू प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र इतर सुविधा ऑनलाईन मिळणार आहेत.

Advertisement
Gram Panchayat Gharacha Utara
Gram Panchayat Gharacha Utara

घराचा उतारा ऑनलाईन कसा काढायचा?

  • मोबाईल मध्ये एक ॲप घ्यावे लागेल.
  • मोबाईल मध्ये mahaegram citizen connect हे ॲप
  • maha egram citizen connect
  • त्यामध्ये आधी नवीन नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी झाल्यानंतर त्याध्ये लॉग इन करा.
  • दाखले/प्रमाणपत्र हा पर्याय ओपन करा.
  • त्यामध्ये विविध पर्याय दिसतील, त्यामधून असेसमेंट उतारा हा ऑप्शन निवडावा लागेल. नंतर आपला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत निवडा तुम्हाला जर मिळकत धारक क्रमांक माहिती असेल तर मिळकत धारक क्रमांक टाकून सर्च करू शकता.“property card online”
  • परंतु मिळकत धारक क्रमांक माहिती नसेल तर मिळकत धारक नाव हा पर्याय निवडून मिळकत धारकाचे नाव मराठीमध्ये टाका आणि सर्च ऑप्शन वरती क्लिक करा.
  • तुमच्यासमोर मिळकत धारकाची यादी पाहायला मिळेल. त्यामधून आपले नाव निवडा. आणि Save बटन वरती क्लिक करा. आपली दाखला मागणीची विनंती यशस्वीरीत्या नोंदविली गेली आहे.
  • अर्जाची स्थिती खालील प्रमाणे दिसेल.

आपण पुन्हा वरील प्रोसेस करून दाखल्याची स्थिती तपासू शकता.

गाव नमुना 8 म्हणजे काय?

गावात एखाद्या व्यक्तीच्या मालकीची एकूण किती जमीन आहे, याची माहिती देणारा दस्तऐवज म्हणजेच आठ अ ( अ) उतारा होय. एखाद्या व्यक्तीची गावाच्या हद्दीत एका पेक्षा जास्त ठिकाणी शेती अथवा जमीन असेल तर त्याची सर्व माहिती जमीन मालकाला आठ अ उतारा या एकाच दस्तऐवजात उपलब्ध होते.

Advertisement

घरठाण उतारा म्हणजे काय?

ग्रामपंचायत हद्दीमधील असेलेल्या इमारती किंवा घरे यांची यादी आणि कर आकारणी ग्रामपंचायत दफ्तरी नमुना ८ मध्ये केली जाते. यामध्ये इमारत/घराचे क्षेत्रफळ, लांबी रुंदी, कर आकारणी आणि इतर तपशील असतो. यालाच ग्रामपंचायत घरठाण उतारा किंवा ग्रामपंचायत घराचा उतारा म्हटले जाते.

ग्रामपंचायतीची 10 कामे कोणती?

ग्रामपंचायतीची 10 कामे नगरपरिषदेच्या योजनांचे लाभ घेतले पाहिजे, प्रशासकीय कामे, जनतेच्या सेवांचे व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शैक्षणिक विकास, न्याय सुविधा, वातावरणाची सुरक्षा, गुंडगिरीची नियंत्रण आणि प्रकल्पांचे निर्माण.

Advertisement

ग्रामपंचायत सदस्य कसे निवडले जातात?

ग्रामपंचायत सदस्य लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात.

Advertisement