टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Whatsapp ग्रुप जॉईन करा

आपलं कुणबी प्रमाणपत्र मिळवा! एका क्लिकमध्ये सर्व कागदपत्रे, अर्जाची माहिती!

Kunbi Caste Certificate: मित्रांनो, आजच्या लेखात आपण कुणबी जात प्रमाणपत्राची तपशीलवार माहिती जाणून घेऊ.

कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कोणत्या कागदपत्रांची गरज असते? अर्जाची प्रक्रिया काय? कुणबी नोंदणी कशी करायची? हे सर्व आपल्याला समजेल.

मनोज जरांगे यांच्या प्रयत्नांनंतर, मराठा OBC समुदायासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर झालाय.

या संदर्भात, कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे, यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखाद्वारे समजावून सांगितली आहे.

कुणबी जाति प्रमाणपत्र

कुणबी ही जात मुळात OBC प्रवर्गात येते, कुणबी म्हणजे जे लोक शेती करतात, आणि जे सर्वस्वी शेती वर अवलंबून आहेत असे लोक.

हे पण वाचा »  महिलांसाठी महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना लवकरच सुरु होणार - जाणून घ्या कसे!

सध्या मनोज पाटील जारांगे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण संघर्ष सुरू आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना OBC प्रवर्गाद्वारे आरक्षण द्यावे अशी मागणी आहे. ज्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल मराठ्यांना नोकरी तसेच शैक्षणिक क्षेत्रात मदत होईल.

ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना लागलीच कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे. सोबतच व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना पण कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

जरी नातेवाईकांकडे कुणबी नोंदी सापडल्या नसतील, तरी पण त्यांच्या नात्यातील कोणाकडेही नोंद सापडली तर सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

कुणबी जाति प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

 1. वंशावळ (वडिल, आजोबा, पंजोबा)
 2. अर्जदाराचा रहिवासी दाखला
 3. जात स्वयंघोषणा प्रमाणपत्र
 4. शाळेचा दाखला (TC) किंवा बोनाफाईड
 5. अर्जदाराचे आधारकार्ड
 6. अर्जदराचे पासपोर्ट फोटो
 7. रेशनकार्ड
 8. जुना सातबारा उतारा
 9. खासरा प्रमाणपत्र
 10. जन्म-मृत्यू नोंदीचा पुरावा (1967 पूर्वीचा)
 11. कुटुंबातील व्यक्तीचे जात प्रमाणपत्र (बंधनकारक नाही)
 12. कुणबी नोंद (1967 च्या पूर्वीची नोंद)
हे पण वाचा »  महाराष्ट्र सरकार द्वारा बांधकाम कामगार योजना

जर तुम्हाला कुणबी नोंद सापडली नसेल, तर तुम्ही कुणबी नोंद ऐवजी; तुमच्या नात्यातील कोणाकडे जर नोंद असेल, तर त्यांचे कुणबी शपथपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.

कुणबी नोंद कोठे शोधावी?

या माहितीमुळे अधिकारी तुमच्या कुणबी नोंदाची प्रमाणित कागदपत्रे तपासताना वापरू शकतात. 1967 पूर्वीच्या कागदपत्रांवरची मागणी ही महत्वाची आहे, इतर कागदपत्रे जसे की जुना सातबारा उतारा, गाव नमुना नंबर 8 इत्यादी म्हणजे अत्यंत महत्वाच्या असू शकतात. तुमच्या कुटुंबातील आणि खासऱ्याच्या कागदपत्रांची नमुने आपल्याला तुमच्या स्थानिक तहसीलदार कार्यालयात शोधून आपल्या प्रमाणांकित करू शकतात.

ऑनलाइन कुणबी प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया

कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कुठं अर्ज करणार

 • खरंतर जात प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस ही एकच असते.
 • कुणबी जात प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस देखील इतर समाजाचे जात प्रमाणपत्र काढण्यासारखीच आहे.
 • यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो.
 • वर दिलेल्या बारा पुराव्यांमध्ये जर कुणबी अशी नोंद असेल तर संबंधित व्यक्ती या पुराव्यानिशी त्यांच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करू शकतात.
 • तहसील कार्यालयात अर्ज सादर झाल्यानंतर सदर अर्जाची पडताळणी प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाते.
 • यानंतर मग प्रांत अधिकारी यांच्या सहीने कास्ट सर्टिफिकेट संबंधित व्यक्तीला दिले जाते.
हे पण वाचा »  जात प्रमाणपत्र कसे काढावे Cast Certificate apply Online | How to Apply for Cast Certificate Online

Leave a Comment