Advertisement
Maha Bhunaksha: जमिनीचा नकाशा, ७/१२ उतारा आणि त्यासंबंधित सर्व माहिती आम्हाला आवश्यक असेल तर आपण तलाठी कार्यालय/तहसीलकडे जाऊ लागतो. पण ही माहिती आपल्याला मोबाइलवरूनही पाहायला मिळते.
Land Record Maharashtra
आपल्या शेतजमिनीचा नकाशा, फेरफार आणि ७/१२ असलेली माहिती आपण मोबाइलवर काही मिनिटांत काढू शकता. यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आपण घरी बसल्यासही ई माहिती मोबाइलवर काही मिनिटांत काढू शकता.
Advertisement

या लेखात आपण आपल्या शेतजमिनीचा नकाशा मोबाइलवर कसे पाहणार? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहात.
जमिनीचा नकाशा कसा पहायचा? (Maha Bhunaksha)
- Land Map Maharashtra: जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी मोबाईल मधील क्रोम ब्रावझर ओपन करा. आणि प्रथम Desktop Site हा पर्याय सुरु करा.

- सर्च बारमध्ये “Maha Bhunaksha” असे टाईप करून सर्च करा. किंवा खालील दिलेली लिंक ओपन करा.
- Site : https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
- वेबसाईट ओपन होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. (आपल्याकडे कॉम्पुटर उपलब्ध असेल तर त्यावरती ओपन करा)“maha bhunaksha 7/12”
- खाली दाखवल्या प्रमाणे आपल्या समोर स्क्रीन दिसेल. डाव्या बाजूला तीन रेषा आहेत. त्यावर क्लिक करा.

- वरीलप्रमाणे आपला जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि Search By Plot No.- Parcel No या पर्यायामध्ये आपला गट नंबर टाका. समोरील सर्च चिन्हावर क्लिक करा.
- आपल्या जमिनींचा नकाशा काही मिनिटातच ओपन होईल त्याचबरोबर Map Report ची PDF सुद्धा काढता येणार आहे.(Land Record)
- नकाशा पाहण्यासाठी पुन्हा (पर्याय 1) डाव्या बाजूला तीन रेषा वरती क्लिक करा. आपला जमिनीचा नकाशा पाहायला मिळेल.
Advertisement