Mahaurja Kusum Solar Yojana : पीएम कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज कसा करायचा? कागदपत्रे कोणती लागतात?, नोंदणी कुठे करावी? “kusum solar yojana” लॉग इन कुठे करायचे? याबद्दल संपूर्ण माहिती यालेखात दिलेली आहे.
Contents
Mahaurja Kusum Solar Yojana
प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी, शासनाने शेतकऱ्यांसाठी kusum.mahaurja.com या वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या साइटवरून अर्ज करावा लागेल. अर्ज करतांना सर्व माहिती अचूकपणे भरावी. एकदा माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट केल्यानंतर, पुन्हा त्यामध्ये कोणताही बदल केले जाऊ शकत नाही.

PM Kusum Solar योजनेची थोडक्यात माहिती
Solar Yojana Maharashtra-पीएम कुसुम सोलर योजनेमधून शेतकऱ्यांना सौर कृषी पंप दिला जातो. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३ एचपी ५ एचपी आणि ७.५ एचपीचा क्षमतेचा सोलर पंप दिला जातो. कुसुम सोलर योजनेतून सोलर पंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९०% अनुदान दिले जाते. तर अनु.जाती व अनु.जमाती (SC&ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५% अनुदान दिले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांना फक्त १०% ते ५% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.
फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलर योजना अर्ज करण्यासाठी {Kusum Solar Pump Yojana Documents} खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- बँक खाते पुस्तक
- एक पासपोर्ट साईज फोटो
- क्षेत्र सामाईक असल्यास २०० रु च्या मुद्रांक कागदावर इतर भोगवट दाराचे न हरकत प्रमाणपत्र.
- पाण्याचा स्त्रोत सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र
Kusum solar pump registration Maharashtra
कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करताना आधी अर्जदार शेतकऱ्याची नोंदणी करणे गरजेचे आहे. नोंदणी “kusum solar registration” करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या साईटवरून नोंदणी करावी. तसेच नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या साईट वरती लॉग इन “kusum solar beneficiary login” करून अर्ज भरावा लागेल अर्ज भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्यानंतरच शेतकऱ्यांना अर्ज सबमिट करता येईल.