Advertisement
Online Nominee Registration: ७/१२ वारस नोंद आपण ऑनलाईन व ऑफलाईन, दोन्ही प्रकारे करू शकता. ऑनलाईन वारस नोंदणीसाठी तुम्हाला कुठलेही जाणण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून आपण वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
वारस नोंद कशी करावी? | How to Do Online Nominee Registration
वारस नोंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने ई हक्क प्रणाली (e hakk pranali) Public Data Entry Portal विकसित केले आहे. या पोर्टलवर आपला ७/१२ संबंधित काम करण्यासाठी आपण ऑनलाइन अर्ज करू शकता.
Advertisement
- अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम https://pdeigr.maharashtra.gov.in/ पोर्टल वरती नोंदणी करावी करावी लागेल.
- पोर्टल ओपन झाल्यानंतर Proceed To Login पर्यायावर क्लिक करा.

- वरील प्रमाणे तुमच्या समोर पर्याय दिसतील त्यामध्ये Create New User Account वरती क्लिक करून आपले खाते तयार करून घ्या.
- तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये आपले वापरकर्ता नाव, संपर्क माहिती, PAN कार्ड माहिती भरावी लागेल.
- आपले खाते तयार झाल्यानंतर वरील प्रमाणे वापरकर्ता नाव आणि पास+वर्ड टाकून लॉग इन करा.

- वरती दाखवल्या प्रमाणे ७/१२ Mutations हा ऑप्शन निवडा. नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये नवीन अर्ज वरती क्लिक करा.
- आपला जिल्हा तालुका गाव निवडा, खालील प्रमाणे नवीन पर्याय ओपन होतील.
- त्यामधील वारस नोंद वरती क्लिक करा.

- खाली दाखवल्या प्रमाणे वारस नोंदणी अर्ज ओपन होईल. त्यामध्ये प्रथम अर्जदाराची माहिती, खातेदाराची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. आणि आपला अर्ज सबमिट करावा.

अशा प्रकारे आपण वारस नोंदिकारिता ऑनलाईन अर्ज करू शकता.
Advertisement