Samuhik Shettale Yojana: सामूहिक शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे योजना करिता ऑनलाईन अर्ज करावा लागेल. योजनेबद्दल सविस्तर माहिती यालेखामध्ये दिलेली आहे.
Contents
Samuhik Shettale Yojana Anudan
सामुहिक शेततळे हे शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेतील लाभ देण्यात येते. सामुहिक शेततळे योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी त्यांना शेतकरी संघटना नोंदवावी लागते. सामुहिक शेततळे योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी-MahaDBT पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. पाहिजेत असल्यास, पाहिजे त्यासाठी आधीच्या काही वर्षांत शेतकऱ्यांना ऑफलाईन अर्ज करण्याची अवधी होती.

परंतु आता शेतकऱ्यांना शेती संबधित कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरती अर्ज करावा लागतो. हि सुविधा पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडत नाही.
योजनेचा घटक: | सामुहिक शेततळे |
लाभार्थी वर्ग: | शेतकरी |
अर्ज कुठे करावा: | MahaDBT अर्ज करा |
Samuhik Shettale Yojana – सामुहिक शेततळे अनुदान योजना 2023
सामुहिक शेततळे या घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरताना महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी गट म्हणून नोंदणी करावी लागेल. तसेच त्या शेतकऱ्याकडे फुले, फळे, भाजीपाला, मसाला पिके इ. पिके असणे गरजेचे आहे. ”Samuhik Shettale Yojana“
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तकाची झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- ७/१२, ८ अ उतारा
- लाभार्थी अनु.जाती, अनु.जमाती प्रवागातील असल्यास जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- हमीपत्र
सामुहिक शेततळ्याकरिता अनुदान किती मिळणार
३४ X ३४ X ४.७० आकारमान असल्यास ३ लाख ३९ हजार पर्यंत अनुदान मिळू शकते.
२४ X २४ X ४ आकारमान असल्यास १ लाख ७५ हजार रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते.
ग्राम पंचायत योजना लाभार्थी यादी पहा (Gram Panchayat Labharthi List)