टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Whatsapp ग्रुप जॉईन करा

शेतकऱ्यांची लॉटरी! दुचाकीवरील Mini Tractor आता बाजारात – आजच पाहा!

Mini Tractor: आजच्या काळात, अनेक शेतकरी आपल्या शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग करत, नवनवीन जुगाड (Mini Tractor) तयार करत आहेत. या स्वस्त आणि उपयुक्त जुगाडमुळे शेतकर्‍यांना शेतीतील कामे सुलभ होत आहेत. आता, छत्रपती संभाजी नगर स्थित Biketor Agro कंपनीने शेतकर्‍यांची गरज लक्षात घेऊन, मोटरसायकलवर चालणारा आश्चर्यकारक जुगाडू ट्रॅक्टर लॉन्च केला आहे. हा मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) लहान शेतकर्‍यांचे शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी तयार केला गेला आहे.

आजच्या काळात, बैलांची संख्या कमी होत आहे आणि त्यांच्या किंमतीही उंच आहेत. लहान शेतकर्‍यांना मोठा ट्रॅक्टर (Mini Tractor) खरेदी करणे परवडणारे नसते. त्यामुळे, Biketor Agro कंपनीचा हा ट्रॅक्टर शेतकर्‍यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. आपण 150 सीसी मोटरसायकलचा वापर करून हा ट्रॅक्टर शेतात चालवू शकता. या ट्रॅक्टरला हार्वेस्टर, स्प्रेअर, पेरणी यंत्र, ट्रॉली आणि रोटाव्हेटर या मुख्य यंत्रांसह जोडून वापरता येते. शिवाय, शेतात वीज नसल्यास पिकांना पाणी देण्यासाठीही हा ट्रॅक्टर उपयोगी पडतो.

हे पण वाचा »  पुणे जिल्ह्यात आता होणार तिसरी महापालिका, जाणून घ्या कोणती?

मोटरसायकलचालित मिनी ट्रॅक्टरचा (Mini Tractor Motor Cycle Powered) कोणत्या कामांसाठी वापर करता येईल

कंपनीने या ट्रॅक्टरला ‘आशा बाईकटर‘ नाव दिले आहे, आणि शेतकर्‍यांना त्याचा वापर करण्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्याची गरज नाही. शेतकरी आपल्या मोटरसायकलला या ट्रॅक्टरशी जोडून वापरू शकतात. शेतकर्‍यांना हा मिनी ट्रॅक्टर पेरणी, खतांची वापर, सिंचन, फवारणी, खुरपणी, कापणी आणि वाहतूक यासाठी देखील वापरता येईल. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ‘आशा बाईकटर’ या ट्रॅक्टरचे प्रदर्शन करण्यात आले होते.

कोणती आहेत वैशिष्ट्ये?

  • या ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकरी 500 किलोपर्यंतचा भार उचलू शकतात.
  • जमिनीपासून 300 मिमी उंची असल्याने, पिकांचे नुकसान होणार नाही.
  • शेतकऱ्यांना शेतातील कामांसाठी होणारा खर्च 60% पर्यंत कमी होऊ शकतो.
  • शेतातील काम आटोपल्यावर, मोटरसायकल पुन्हा इतर कामांसाठी वापरता येते.
  • ट्रॅक्टरचा ताशी वेग 10 ते 15 किमी आहे. हा ट्रॅक्टर 150cc ते 350cc क्षमता असलेल्या मोटरसायकलसह काम करू शकतो.
  • ऊन, वारा, पाऊसापासून संरक्षणासाठी केबिनची व्यवस्था देखील केली गेली आहे.
हे पण वाचा »  बापरे! घराच्या बाहेर पडताच तरुणीचे केस बर्फानं गोठले; VIDEO पाहून कळेल परिस्थिती

किती आहे किंमत?

Biketor Agro कंपनीचा ‘आशा बाईकटर‘ हा मिनी ट्रॅक्टर सध्या महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात उपलब्ध आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची किंमत अडीच लाख रुपये ठेवली आहे. तीन वर्षांच्या कठीण परिश्रमानंतर कंपनीने हा ट्रॅक्टर बाजारात आणला आहे. हा मिनी ट्रॅक्टर असून, त्याच्या वापरामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अधिक सोपे होईल.

Leave a Comment