टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Whatsapp ग्रुप जॉईन करा

PMFBY तुम्ही रब्बी पिकांचा विमा भरला का? ‘ही’ आहे शेवटची मुदत

खरीप हंगामाप्रमाणेच आता यावर्षीच्या रब्बी हंगामातही गहू, हरभरा, रब्बी कांद्यासह आपल्या इतर पिकांचा विमा शेतकऱ्यांना एका रुपयात काढता येणार आहे. सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

मागील वर्षी २०२२-२३ च्या रब्बी हंगामात साडेसात लाख शेतकऱ्यांनी साडेपाच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांचा एका रुपयात विमा उतरविला होता. तर यंदाच्या २०२३-२४ च्या खरीप हंगामात सुमारे एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी एक कोटी १२ लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला होता. सलग दोन हंगामात पीक विमा योजनेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे यंदाच्या रब्बी हंगामातही पीक विमा काढण्यास मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पीक निहाय मुदत – रब्बी हंगामासाठी सरकारकडून पीकनिहाय मुदत देण्यात आली आहे. रब्बी ज्वारीसाठी नोव्हेंबरअखेर, तर बागायत गहू, हरभरा, रब्बी कांद्यासाठी १५ डिसेंबर; तसेच उन्हाळी भात व भुईमूग पिकांसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे. असे कृषी विभागाने म्हटले आहे.

राज्य सरकार भरणारशेतकरी हिस्सा – शेतकऱ्यांना पिकाच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत गारपीट, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, पावसातील खंड आदी नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनाची हानी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाची फरतफेड, पुढील पेरणीसाठी आर्थिक जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांना अडचणी येतात. यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा योजनेचा लाभ दिला जातो. योजनेत यावर्षीपासून शेतकरी हिस्सा राज्य सरकार भरणार आहे. या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही एका रुपयात नोंदणी करता येते.

हे पण वाचा »  अर्ज भरला, आता हे काम करा: Solar Pump Kusum Yojana

PMFBY शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार पिक विमा योजनेसाठी नोंदणी

शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र या अडचणीवरून मात देऊन शेतकरी आपलं पीक फुलवत असतात. मात्र नैसर्गिक आपत्ती, आसमानी संकट, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याचा हातात तोंडाशी आलेला घास कधीकधी नष्ट होतो. याचा विचार करून सरकार शेतकऱ्यांना मदत देखील करत असते. शेतकऱ्यांसाठी देशात कायमच नवीन योजना राबवल्या जातात. आता सध्या देखील सरकारने एक योजना चालू केली आहे तिचं नाव आहे पंतप्रधान पिक विमा योजना.

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, यामुळे जर शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली तर त्यांना आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे विमा काढण्याचे अहवान सरकार करत आहे. या योजनेची शेवटची तारीख 31 जुलै होती पण आता सरकारने ही तारीख वाढवली आहे.

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख होती मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शेतकऱ्यांना 16 ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी यासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरून किंवा फोन वरून अर्ज भरू शकता. तुम्हाला यासाठी www.pmfby.gov.in या ठिकाणी भेट देऊन सर्व स्टेप फॉलो करून अर्ज भरावा लागेल.

हे पण वाचा »  Mahaurja Login Registration: येथून करा सोलर पंपसाठी ऑनलाईन अर्ज

त्याचबरोबर तुम्ही Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करून याद्वारे देखील अर्ज भरू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर ला जाऊन हे ॲप इंस्टॉल करावे लागेल त्यानंतर ॲप इंस्टाल झाल्यानंतर सरकारी योजना या ऑप्शनमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला कोणतीही पैसे द्यायची गरज नाही त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.

माहितीनुसार खरीप. हंगामातील भात, ज्वारी,मूग, उडीद, तूर, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कापूस कारळे, तीळ आणि खरीप कांदा अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे

आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतामधील रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पिक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

बऱ्याचदा असं होतं की हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे जमीन दोस्त होते त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या सोडून दुसरा पर्याय दिसत नाही त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे

हे पण वाचा »  महाराष्ट्रातील पॉवर टिलर अनुदानाची अद्यतनित माहिती: जाणून घ्या कसे करा अर्ज!

शेतकऱ्यांना दिलासा… पीक विम्याला ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

यंदापासून एक रुपयात पीक विम्यात शेतकऱ्यांना सहभाग नोंदविता येत आहे. यासाठी ३१ जुलै ही डेडलाइन असताना योजनेच्या पोर्टलची गती मंद आहे. यामुळे एक लाखावर शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असतांनाच ३ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

योजनेत सहभागासाठी सातत्याने तांत्रिक अडचणींचा अडसर येत आहे. यामध्ये आधार क्रमांक व्हेरिफाय होत नाही, तर कधी सात-बाराचे संकेतस्थळ बंद असते. यामधून सुटले, तर पीक विमा योजनेचे पोर्टल स्लो असल्याने शेतकरी त्रासून गेले आहेत.

एक रुपयात पीक विमा परतावा मिळणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्रात (सीएससी) गर्दी केलेली आहे. उशिराच्या पावसाने शेतकरी पेरणीत व्यस्त होते. नंतर अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होऊन यातून शेतकरी सावरून पीक विम्यात सहभाग घेण्यासाठी केंद्रात जात असताना सर्व्हर डाऊनचा खोडा चिंता वाढवित असतांना मुदतवाढीने दिलासा मिळाला आहे.

कर्जदार शेतकऱ्यांसाठी बँकांचाही खोडा – जिल्ह्यातील किमान दीड लाख कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग नोंदविला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांद्वारे खरिपासाठी कर्ज घेत असताना काही बँका अर्जासोबतच पीक विम्याशी संबंधित ‘ऑप्ट आऊट फार्म’वर सह्या घेत आहेत. त्यामुळे कर्जदार शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment